

Hinjewadi IT Park pune
esakal
Anti Terror Mock Drill : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये बुधवारी (ता. ५) सायंकाळनंतर अचानक मोठा पोलीस बंदोबस्त आणि १०० हून अधिक एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) कमांडोंचा ताफा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र, कोणत्याही दहशतवादी धोक्याची घटना नसून आयटी पार्कच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी एनएसजीकडून पाच तासांचे विशेष 'मॉक ड्रिल' आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दुपारी ४ वाजता सुरू झालेली ही मोहीम रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. जागतिक दर्जाच्या आयटी पार्कच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेण्यासाठी एनएसजीने विशेष सराव आयोजित केला होता.