
कोरेगाव भीमा : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिल्याच्या घटनेला २०२७ ला १०० वर्षे होत असल्याने शतकपूर्तीनिमित्त एक कोटी भीमअनुयायांची मानवंदना अर्पण करण्यासाठी शाहु-फुले-आंबेडकर विचाराच्या विविध पक्षसंघटनांच्या माध्यमातून भव्य अभिवादन सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समिती पुढाकार घेणार असल्याचे सांगून या शतकपूर्ती कार्यक्रमाची तयारी यावर्षीपासूनच करण्यात येत असल्याचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.