मनपा

मनपा
Published on

हजार कोटींच्या कर्जाचा आरोप तथ्यहीन

आयुक्त यशवंत डांगे ः नवीन पाणी व भुयारी गटार योजना कर्ज प्रकरण

अहिल्यानगर, ता. १३ ः शहरासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन पाणीपुरवठा आणि भुयारी गटार (टप्पा २) योजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. परंतु महानगरपालिका एक हजार कोटींचे कर्ज काढून नगरकरांवर करवाढीचा बोजा लादणार असल्याचे आरोप चुकीचे व तथ्यहीन आहेत. दोन्ही योजनांपैकी एकच योजना विचाराधी आहे. महानगरपालिकेला केवळ २५ टक्के रक्कम स्वहिसा म्हणून उभारावी लागणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
अहिल्यानगर महापालिकेकडून पाणी योजनेसाठी आणि भुयारी गटार योजनेसाठी स्वहिस्सा उभारण्यासाठी प्रस्ताव केले आहेत. नगर विकास विभागाच्या ‘महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनेंतर्गत जागतिक बँकेच्या साहाय्याने निधी उभारणीसाठी महानगरपालिकेने प्रस्ताव पाठवले होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार या प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासन जागतिक बँकेकडून कर्ज घेणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना ती रक्कम ‘अनुदान’ स्वरूपात दिली जाणार आहे. या रकमेवर महापालिकेला एक रुपयाचेही व्याज द्यावे लागणार नाही किंवा कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागणार नाही. योजनेच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के रक्कम सहायक अनुदान म्हणून शासनाकडून उपलब्ध होईल, तसेच २५ टक्के रक्कम अर्बन चॅलेंज फंडमधून किंवा राज्य अनुदानातून मिळेल. त्यामुळे महापालिकेला केवळ २५ टक्के हिस्साच उपलब्ध करायचा आहे. शासनाच्या नगरोत्थान आणि अमृत योजनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा हिस्सा ३० टक्के असतो, त्या तुलनेत या नव्या योजनेत महापालिकेला ५ टक्के कमी हिस्सा भरावा लागणार आहे. सध्या नगरोत्थान आणि अमृत योजनेमध्ये निधी उपलब्ध नसल्याने या योजनेचा पर्याय निवडला आहे, असे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.
---
एकच योजना विचाराधीन

महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा आणि भुयारी गटार या दोन योजनांपैकी केवळ एकाच योजनेवर विचार सुरू आहे. जागतिक बँकेकडून सध्या केवळ प्राथमिक आर्थिक आणि तांत्रिक तपासणी केली जात आहे. त्यामुळे एक हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा आणि ते फेडण्यासाठी करवाढीचा आरोप तथ्यहीन असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Direct Pipeline
Krishna river water diversion project for Solapur
Koyna water diversion project to Mumbai
Koyna Water Diversion Survey for Mumbai Rekindles Debate on Water Supply Project Cost and Konkan Concerns
Marathi News Esakal
www.esakal.com