Pune Crime : सतीश वाघ खूनप्रकरणी एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; आरोपी अक्षय जावळकर, मोहिनी वाघ मुख्य सूत्रधार

सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
mohini wagh and akshay javalkar
mohini wagh and akshay javalkarsakal
Updated on

पुणे - सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने हा खून झाल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.

आरोपी अक्षय जावळकर हा वाघ यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर राहत होता. त्याने सतीश सादबा वाघ (वय-५८, रा. फुरसुंगी) यांची पत्नी मोहिनीच्या सांगण्यावरून आरोपी पवन शर्माला पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. सतीश वाघ ९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी फिरण्यास गेले होते.

त्यावेळी आरोपी शर्मा आणि साथीदारांनी वाघ यांचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर वाघ यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यांचा मृतदेह उरुळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात आढळून आला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अक्षय जावळकर, मोहिनी वाघ, आतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना अटक करण्यात आली होती.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खूनप्रकरणी नोंदवला ३५ साक्षीदारांचा जबाब

आरोपींनी खून केल्यानंतर हत्यार पेरणे पुलाजवळ भीमा नदीपात्रात फेकून दिले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटार, १६ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण, सतीश वाघ यांचा मोबाईल आणि एक लाख ५६ हजारांची रोकड जप्त केली आहे. न्यायालयासमोर महत्त्वाच्या ३५ साक्षीदारांचा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.

मांत्रिकाकडून जादूटोण्याचा प्रयत्न

सतीश वाघ यांचा अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी पत्नी मोहिनीने वर्षापूर्वी एका मांत्रिकाची भेट घेतली होती. या मांत्रिकाकडून वाघ यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे आरोपपत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com