बाप रे...पुणे कॅन्टोन्मेंटच्या एकाच वॉर्डात 101 कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आठही वॉर्डात आतापर्यंत 175 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यातील 88 जणांनी कोरोनावर मात केली आहे; तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

कॅन्टोन्मेंट (पुणे) : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आठही वॉर्डात आतापर्यंत 175 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यातील 88 जणांनी कोरोनावर मात केली आहे; तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 85 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तसेच, बोर्डात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक 101 रुग्ण हे वॉर्ड क्रमांक चारमध्ये आढळले. त्यातील 56 रुग्णांचा डिस्चार्ज झाला असून, सध्या 45 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर, वॉर्ड क्रमांक सातमध्ये सध्या शून्य रुग्ण आहेत. 

सकाळी आंदोलन आणि दुपारी अजित पवारांच्या मांडीला

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्नात आहे. बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल या रुग्णालयात कोरोनाबाधित असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. अनेकांना बोर्ड परिसरात असणाऱ्या शाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात एकूण आठ वॉर्ड आहेत. यामध्ये सर्वाधिक कोरोनाच्या संक्रमण असलेल्या केसेस वॉर्ड क्रमांक चारमध्ये आहे. 

पुणेकरांच्या अंगणात ठाकरे सरकारविरोधात रणांगण

कॅन्टोन्मेंट बोर्डातील कोरोना रुग्णांची 10 मे ते 21 मे दरम्यानची आकडेवारी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली. संपूर्ण बोर्डात आढळलेल्या 175 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 88 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे; तर 85 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहे. आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, वॉर्ड क्रमांक चारमधील एकूण 101 रुग्णांपैकी 56 जणांचा डिस्चार्ज झाला असून, सध्या 45 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तसेच, वॉर्ड क्रमांक सातमध्ये एकूण 8 रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून, सात जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे येथे सध्या शून्य रुग्ण आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कॅन्टोन्मेंट परिसरातील वॉर्डनिहाय रुग्णांची आकडेवारी 
वॉर्ड क्रमांक 1 - एकूण 18 रुग्ण, एकाला डिस्चार्ज, 17 पॉझिटिव्ह. 
वॉर्ड क्रमांक 2 - एकूण 3 रुग्ण पॉझिटिव्ह. 
वॉर्ड क्रमांक 3 - एकूण 10 रुग्ण, एकाचा मृत्यू, 9 पॉझिटिव्ह. 
वॉर्ड क्रमांक 4 - एकूण 101 रुग्ण, 56 जणांना डिस्चार्ज, 45 पॉझिटिव्ह. 
वॉर्ड क्रमांक 5 - एकूण 4 रुग्ण, चारही जणांना डिस्चार्ज 
वॉर्ड क्रमांक 6 - 1 रुग्ण पॉझिटिव्ह. 
वॉर्ड क्रमांक 7 - एकूण 8 रुग्ण, एकाचा मृत्यू, सात जणांना डिस्चार्ज, सध्या शून्य रुग्ण 
वॉर्ड क्रमांक 8 - एकूण 30 रुग्ण, 20 जणांना डिस्चार्ज, 10 पॉझिटिव्ह.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 101 corona affected in a single ward of Pune Cantonment