पुणेकरांच्या अंगणात ठाकरे सरकार विरोधात रणांगण

aundh12.jpg
aundh12.jpg

पुणे ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या आपत्ती विरोधात लढण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याची भूमिका घेत भाजपच्या वतीने मेरा आंगण, मेरा रणांगण , महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पुण्यातील उपनगरांतूनही प्रतिसाद मिळाला.

औंधमध्ये भाजपचे आंदोलन
औंध : प्रशासन कोणतीही जवाबदारी स्वीकारत नसून राज्याला कोरोनाच्या संकटात जनता वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे होणारे मृत्यू,पोलीस बांधवांचे होणारे मृत्यू , डॉक्टरांवर होणारे हल्ले यास राज्य सरकार व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला गेला. तसेच गोरगरीब जनतेवर आर्थिक संकट आले असुन त्यांच्यासाठी  राज्य सरकारच्या वतीने आर्थिक पॅकेज देण्यात यावे या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

औंध येथे करण्यात आलेल्या आंदोलनात शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्र  साळेगावकर, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ कुंडलीक, सरचिटणीस गणेश बागडे,अमोल कांबळे, आकाश ढोणे,अविनाश लोंढे,मनोहर थोरात हे उपस्थित होते. तर बालेवाडी येथे नगरसेवक अमोल बालवडकर, शशिकांत बालवडकर, योगेश बालवडकर, अर्जुन बालवडकर, सुमित कांबळे, रोनक गोटे, बाबाराव गित्ते, दत्तात्रय बालवडकर, वैभव बालवडकर, सुभाष भवाळे इत्यादी उपस्थित होते. बाणेर येथे नगरसेविका स्वप्नाली सायकर  यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले . यामध्ये कार्यकारीणी  सदस्य राधेशाम शर्मा , प्रल्हाद सायकर,गोसेवक विश्वास कळमकर,कौशल टंकसाळी, सच्चिदानंद सायकर,निलेश सायकर यांनी सहभाग घेतला.

शिवाजीनगरमध्ये  भाजपच्या वतीने निषेध आंदोलन

गोखलेनगर : येथे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या नेतृत्वाखालील शिवाजीनगर मतदारसंघात १५८ बूथ मध्ये, ज्ञानेश्वर पादुका चौक, कुसाळकर चौक तसेच शिवाजीनगरमध्ये विविध भागात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, अध्यक्ष शिवाजीनगर भाजपा रवींद्र साळेगावकर, शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे, प्रतुल जागडे, ओंकार केदारी, जय जोशी यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

नरपातगिरी चौकात  ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारचा निषेध                

खडकी बाजार :  पुण्यातील नरपतगिरी चौक येथे श्री साई प्रतिष्ठान तर्फे ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपच्या व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन  काळ्या रंगाच्या फलकावर आपला निषेध व्यक्त केला. नरपतगिरी चौकात शुक्रवार (ता. २२) सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व श्री साई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमा झाले होते हातात भाजपाचे झेंडे घेऊन ' ठाकरे सरकार कोरोना संसर्गाची साखळी तोडा अथवा खुर्ची सोडा,  ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध अशा आशयाचे काळे फलक घेऊन कार्यकर्ते चौकातच उभे होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

यावेळी कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्स व तोंडाला मास्क बांधले होते. पुण्यात प्रत्येक चौकात  भारतीय जनता पार्टी पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे साई प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप बहिरट यांनी सांगितले.

सिंहगड रस्ता परिसरात सोशल डिस्टन्सचे पालन करत आंदोलन


सिंहगड रस्ता : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतांना आपत्ती व्यवस्थापन करण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. सिंहगड रस्ता परिसरात आज विविध ठिकाणी सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले. यात नगरसेविका ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे, भारतीय जनता पक्षाचे खडकवासला विधानसभेचे अध्यक्ष सचिन मोरे, दीपक नागपुरे, प्रतीक देसरडा, मंगेश खराडे, केदार नामजोशी, अमोल चौधरी, दिनेश जाधव, निखील कुलकर्णी, संदीप वाघमारे आदींनी आंदोलन केले. खडकवासला मतदार संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com