esakal | बारामतीत कोरोना रुग्णांचे शतक
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत कोरोना रुग्णांचे शतक

42 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, 17 जणांचे अहवाल प्रतिक्षेत

बारामतीत कोरोना रुग्णांचे शतक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : शहरात एकाच दिवशी 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे बारामतीने कोरोनाचे शतक पूर्ण केले. काल एकूण 59 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 42 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, 17 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

प्राप्त झालेल्या 42 अहवालांपैकी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये काल पॉझिटिव्ह आलेल्या गुरुकुल सोसायटी शिव नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा तसेच जामदार रोड कसबा येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा व मुक्ती अपार्टमेंट कसबा येथील एकाचा खंडोबानगर दत्त मंदिराजवळ येथील दोन जणांचा, मारवाड पेठ येथील एक जणांचा व ख्रिश्चन कॉलनीतील एकाचा असे 11 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहोचली आहे. यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला असून, 45 जण बरे झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, 46 रुग्ण उपचार घेत आहेत. बारामतीतील रुग्णांचा आकडा नियमितपणे वाढत आहे, ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत आज रात्री संपणार असून, आता वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये प्रवासाचा इतिहास असलेल्यांची संख्या मोठी आहे. प्रवास करुन आलेल्या लोकांमध्ये ही लक्षणे वेगाने दिसत आहेत. त्यामुळे प्रवास केलेल्यांनी तपासणी करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे मत आहे.