इंदापुरातील १०१ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाला केले चितपट 

प्रशांत चवरे
Monday, 5 October 2020


कुटुंबीयांसह डाळजच्या ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत 

भिगवण (पुणे) : कोरोनाचे नाव घेतले की भल्या भल्यांची भंबेरी उडत असताना डाळज क्र. 1 (ता. इंदापूर) येथील 101 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर अकराव्या दिवशीच यशस्वीरीत्या मात केली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजींनी कोरोनावर मात करत इतरांना खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनावर मात करून गावांमध्ये प्रवेश केल्यानंतर आजींचे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंदोदरी हरिबा जगताप असे कोरोनावर मात केलेल्या 101 वर्षाच्या आजींचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी डाळज क्र. 1 (ता. इंदापूर) येथे कोरोनाने प्रवेश केला. यामध्ये जगताप कुटुंबातील 101 वर्षाच्या मंदोदरी जगताप यांच्यासह इतरही तीन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला. 24 सप्टेंबर आजींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. वयामुळे कुटुंबाला त्यांच्या आरोग्याची काळजी वाटत असल्यामुळे त्यांना तातडीने येथील खासगी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

पुण्याच्या चिरागची पुन्हा बाजी! आता JEE Advance मध्ये देशात अव्वल

अकरा दिवसांच्या उपचारानंतर आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली. डॉक्‍टरांसह आजींचे पुत्र कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गजानन जगताप, नातू नितीन जगताप, संतोष जगताप, महेश जगताप यांनी आजींची योग्य ती काळजी घेतली. आजींवर डॉ. महेश गाढवे, डॉ. दत्तात्रेय पवार यांनी उपचार केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 101-year-old grandmother from Indapur fight with corona