पुणे जिल्ह्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients
पुणे जिल्ह्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) शनिवारी (ता. १५) सलग दुसऱ्या दिवशी एका दिवसात दहा हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. शनिवारी जिल्ह्यात १० हजार २८१ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. हाच आकडा शुक्रवारी (ता. १४) दहा हजार ७६ इतका होता. याऊलट दिवसातील नवीन रुग्णांच्या तुलनेत निम्‍याहून कमी कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत. शिवाय मागील सहा महिन्यांच्या खंडानंतर शनिवारी पहिल्यांदाच कोरोनाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतार्यंत दिवसात एक किंवा दोनच मृत्यू होत असत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना आकडेवारीच्या अहवालातन हे स्पष्ट झाले आहे.

दिवसातील जिल्ह्यातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार ७०५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ५४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ४२४, नगरपालिका हद्दीत ४३२, कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १७५ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा: पुणेकर नियम पाळत नसल्यानेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ - अजित पवार

जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील २ हजार ३३८, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७०, नगरपालिका हद्दीतील १५१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६४ जण आहेत. दिवसातील एकूण कोरोना मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि पिंपरी चिंचवड, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण ५५ हजार ९९७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २ हजार १४२ रुग्णांवर शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित ५३ हजार ८५५ गृहविलगीकरणात आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top