पुणे जिल्ह्यात 103 टक्के पोलिओ लसीकरण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नुकताच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सप्ताह पार पडला. या सप्ताह अखेर ग्रामीण भागातील 5 लाख 5 हजार 760, तर शहरी भागातील 80 हजार 846 अशा एकूण 5 लाख 86 लाख 606 बालकांना पोलिओची लस देण्यात आली आहे.

पुणे - पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नुकताच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सप्ताह पार पडला. या सप्ताह अखेर ग्रामीण भागातील 5 लाख 5 हजार 760, तर शहरी भागातील 80 हजार 846 अशा एकूण 5 लाख 86 लाख 606 बालकांना पोलिओची लस देण्यात आली आहे. हे लसीकरण निश्‍चित उद्दिष्टापेक्षा तीन टक्के अधिकचे पूर्ण करण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. पवार म्हणाले, ""19 जानेवारी रोजी लसीकरण मोहीम झाल्यानंतर एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पुढील पाच दिवस एसटी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, बाजार, यात्रा, धार्मिक स्थळे, प्रवासातील लाभार्थी, खासगी दवाखाने, या ठिकाणी बूथ ट्रान्झिट टीम व मोबाईल टीमद्वारे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये ग्रामीण भागातील 5 लाख 5 हजार 760 म्हणजे 103.3 टक्के, तर शहरी भागातील 80 हजार 846 म्हणजेच 102.3 टक्के लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले.'' 

लसीकरण का आवश्‍यक? 
देशात 1998 मध्ये 4 हजार 316 रुग्ण आढळून आले. त्यानंतर 2011 नंतर पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही. पुणे जिल्ह्यात 1999 नंतर पोलिओचा रुग्ण आढळला नाही. अफगाणिस्तान व पाकिस्तान या शेजारील देशामध्ये तुरळक स्वरूपात पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी देशात अद्याप पोलिओ लसीकरण आवश्‍यक आहे. 

उद्दिष्ट व लसीकरण 
- पुणे शहर व जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील 5 लाख 68 हजार 830 बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट 
- पुणे ग्रामीण भागात 4 लाख 89 हजार 770 बालकांचा समावेश 
- शहरी भागात 79 हजार 60 बालकांचा समावेश 
- एकूण 5 लाख 86 लाख 606 बालकांना लसीकरण 
- जिल्ह्यात हवेली तालुक्‍यात सर्वाधिक 1 लाख 36 हजार 53 बालकांना लस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 103 percentage polio vaccination in Pune district