‘टीईटी’च्या प्रश्‍नपत्रिकेत १०५ चुका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्‍नपत्रिका तज्ज्ञांकडून तपासून घेऊनदेखील शुद्धलेखनाच्या चुका तशाच राहिल्या. अनेक चुका असलेली प्रश्‍नपत्रिका समोर आल्याने भावी शिक्षकांना डोक्‍याला हात लावून परीक्षा देण्याची वेळी आली. पेपर दोनमधील ३२ पानांच्या प्रश्‍नपत्रिकेत केवळ तीन पानांमध्ये तब्बल १०५ चुका आढळून आल्या आहेत.

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्‍नपत्रिका तज्ज्ञांकडून तपासून घेऊनदेखील शुद्धलेखनाच्या चुका तशाच राहिल्या. अनेक चुका असलेली प्रश्‍नपत्रिका समोर आल्याने भावी शिक्षकांना डोक्‍याला हात लावून परीक्षा देण्याची वेळी आली. पेपर दोनमधील ३२ पानांच्या प्रश्‍नपत्रिकेत केवळ तीन पानांमध्ये तब्बल १०५ चुका आढळून आल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात शिक्षण म्हणून नोकरी मिळवायची असेल, तर ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये असलेल्या अनेक चुकांमुळे भावी शिक्षकांची पंचायत झाली. ३२ पानांच्या पेपर दोनमधील १० पानांवर ३८ चुका आहेत, तर पान क्रमांक १२ वर ३२, पान क्रमांक १४ वर ३५ चुका आहेत. यामध्ये ‘तिसऱ्या’ऐवजी ‘निसऱ्या’, ‘झपाट्याने’ऐवजी ‘झपय्याने’, ‘सुरू’ऐवजी ‘सुका’, ‘बेशुद्ध’ऐवजी ‘वेशुद्ध’, ‘ध्वनी’ऐवजी ‘ध्वनि’, ‘होताना’ऐवजी ‘होनात’, ‘ठिकाणी’ऐवजी ‘ढिकाणी’, ‘करून’ऐवजी ‘ककन’, ‘देतो’ऐवजी ‘देनो’, ‘कुटुंब’ऐवजी ‘कुदुंब’, ‘शिक्षकाकडे असलेले’ऐवजी ‘शिक्षकाळडे असलिले’ यासारख्या १०५ चुका या पानांमध्ये आहेत. 

‘टीईटी’च्या प्रश्‍नपत्रिका तज्ज्ञांनी तपासल्यानंतरच त्या पुढे जातात. त्यानंतरही चुका राहिल्याने नेमकी ही चूक टायपिंग करताना झाली, की छपाईच्या वेळेस झाली, याबाबत चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना किती गुण दान करायचे, यावर बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. या चुका करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- तुकाराम सुपे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 105 mistake in the TET question paper