पुणे जिल्ह्यात आज १०७२ नवे कोरोना रुग्ण; सात हजार चाचण्या 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख १२ हजार ६९९ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ८२ हजार ६७५ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आज अखेरपर्यंत एकूण ७ हजार ३७६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १६) दिवसभरात १ हजार ७२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४८९ जण आहेत. आज ७ हजार ११ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याशिवाय दिवसभरात २ हजार ३८ कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये २२८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २२९, नगरपालिका क्षेत्रात ९८  आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २८ नवे रुग्ण सापडले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख १२ हजार ६९९ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ८२ हजार ६७५ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आज अखेरपर्यंत एकूण ७ हजार ३७६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३२४  जण आहेत.

हेही वाचा :  साधने असूनही स्मार्ट सिटी मागे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1072 new corona patients in Pune district today; Seven thousand tests