esakal | पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय; गेल्या तीन दिवसांत...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

सध्या विविध रुग्णालयांत १३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय; गेल्या तीन दिवसांत...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या २५७३ पैकी १0८९ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत साडेतीनशेहन अधिक जण बरे झाले आहेत. दरम्यान, सोमवारी दिवसभरात नवे ९१ रुग्ण सापडले असून, तर पाच रुग्ण मरण पावले आहेत. पुण्यातील मृतांची संख्या १४९ पर्यंत गेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे शहरात नऊ मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला; त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. गेल्या आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, या पाच दिवसांत ती पुन्हा वाढली आहे. तेव्हाच, कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून, रविवारी दिवसभरात १९४ रुग्ण बरे आपापल्या घरी गेले होते. त्यानंतर सोमवारी ६९ बरे झाल्याने आतापयंत १ हजार ८९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

- राष्ट्रवादी, भाजपचं चुकलचं; शिवसेनेनं न्याय दिला

शहरात आतापर्यंत २३ हजार ७५९ जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यातील २ हजार ५७३ जणांना कोराेना झाला आहे. यातील ९८ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले.

- राज्यात उद्योग चक्र सुरु: उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली ही महत्वाची माहिती

त्यातील १९ जण अतिदक्षता विभागात आहेत. सध्या विविध रुग्णालयांत १३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिवसभरात १00८ नागरिकांची तपासणी झाली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

loading image
go to top