राष्ट्रवादी, भाजपचं चुकलचं; शिवसेनेनं न्याय दिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mangesh kolapkar maharashtra mlc election analysis bjp ncp shivsena

पक्ष कार्यासाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या आणि विधान परिषदेच्या आशेवर असलेल्या पुण्यातील दोन महिला नेत्यांच्या नशिबी पुन्हा वेटिंग आले आहे.

राष्ट्रवादी, भाजपचं चुकलचं; शिवसेनेनं न्याय दिला

पुणे : पक्ष कार्यासाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या आणि विधान परिषदेच्या आशेवर असलेल्या पुण्यातील दोन महिला नेत्यांच्या नशिबी पुन्हा वेटिंग आले आहे. पक्षाकडून नव्हे तर, काही जणांकडून अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पुण्यातीलच आणखी एका महिलेला न्याय मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे तर, शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत एक्सटेंशन मिळाल्यामुळे पक्षात त्यांचे वजन वाढल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे रविवारी सायंकाळी स्पष्ट झाले. त्यात भाजपला 2, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी 2 तर कॉंग्रेसला एक जागा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नाराजीनाट्य आता चव्हाट्यावर येऊ लागले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी यांच्या कोथरूड मतदारसंघात विधानसभेच्या वेळी चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी भरली. त्यामुळे डावलल्या गेलेल्या कुलकर्णी यांनी योग्य दखल घेण्यात येईल, आश्वासन पक्षातील नेत्यांनी दिले होते. कुलकर्णी या आमदार म्हणून सक्रीय होत्या, हे त्यांचे पक्षांर्तगत विरोधकही मान्य करतात. चांगल्या पद्धतीने काम केले, जनसंपर्क मोठा, चांदणी चौकातील उड्डाण पुलासारखे अनेक विकास प्रकल्प मार्गी लावण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यामुळे यावेळी विधान परिषदेसाठी त्यांचा नक्कीच विचार होईल, अशी त्यांना त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. पण, तूर्त तरी त्यांना वेटिंग असेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाधित क्षेत्रात पूर्ण लॉकडाऊन; दवाखाने सुरु राहणार

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार त्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्यत्वासाठी उमेदवारी दिली होती. परंतु, तेथेही ऐनवेळी चक्रे फिरली आणि चाकणकरांची संधी गेली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी चाकणकर यांनी खडकवासला मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्यासारखे काम केले होते. तसेच महिला प्रदेशाध्यक्ष म्हणूनही चाकणकर महाराष्ट्रात सक्रिय आहेत. त्यामुळे त्या पदासाठी तरी आमदारकीची संधी मिळेल, असे त्यांना वाटत होते. परंतु, पुन्हा एकदा त्यांच्या परंपरागत स्थानिक विरोधकांनी नेत्यांकडे कागाळ्या केल्या अन त्यामुळेच चाकणकरांची रवानगी वेटिंगवर झाली.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांना गंडविले; मोफत प्रवासाचा दिलासा नाहीच

शिवसेनेने मात्र, डॉ. नीलम गोऱ्हे यांना न्याय दिला. विधान परिषदेचे उपसभापतीपद देतानाच आता आमदारकीचे एक्सटेंशनही दिले आहे. त्यामुळे पक्षात गोऱहे यांचे वजन वाढले आहे, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. गोरङे अभ्यासू असल्यामुळे अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी ते दाखवून दिले आहे. त्यामुळेच पक्षाला त्यांची दखल घ्यावी लागली, असेही काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

loading image
go to top