Breaking:दहावी-बारावीची पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

टीम ई-सकाळ
Tuesday, 20 October 2020

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत  दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे.

पुणे : फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण न झालेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी पुरवणी लेखी परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

आणखी वाचा - भगतसिंह कोश्यारी यांना न्यायालयाची नोटीस 

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत  दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान आयोजित केली आहे.
परीक्षांचे विषय आणि दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या  www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असणार आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत देण्यात आलेले छापील वेळापत्रकच अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री विद्यार्थ्यांनी करून घ्यावी आणि त्याप्रमाणे परीक्षा द्यावी. विद्यार्थ्यांनी अन्य संकेतस्थळावर, अन्य व खासगी यंत्रणेने किंवा व्हाट्सएप आणि अन्य माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा - पंतप्रधान दारूडे, आता देश विकतायत : प्रकाश आंबेडकर

दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक

  • दहावी : २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२०
  • बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम) : २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२०
  • बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) : २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२०

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10th and 12th board supplementary exam time table declaration