दहावी-बारावीचा अभ्यासक्रम कमी झाला; पण बोर्डची परीक्षा पद्धती कशी असणार!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

घरात खरतर कोणी दहावी आणि बारावीला असले की एक वेगळेच वातावरण घरात पहायला मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट असणाऱ्या या परीक्षांची तयारी प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सुरू होते. यंदाही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ही तयारी एप्रिल-मे महिन्यापासून सुरू केली आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीपर्यंत अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय झाला. परंतु त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दरम्यान होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धती नेमकी कशी असेल !, याची उत्सुकता लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आहे. मात्र आता लवकरच ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

घरात खरतर कोणी दहावी आणि बारावीला असले की एक वेगळेच वातावरण घरात पहायला मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट असणाऱ्या या परीक्षांची तयारी प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सुरू होते. यंदाही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ही तयारी एप्रिल-मे महिन्यापासून सुरू केली आहे. लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाइनद्वारे खासगी शिकवणी वर्ग आणि शाळांचे ज्यादा तासाद्वारे अभ्यास सुरू केला. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने लॉकडाउन वाढला अनलॉक झाले आणि दरवर्षीप्रमाणे प्रत्यक्ष शाळा भरण्याऐवजी जूनपासून ऑनलाइन शिक्षणास सुरवात झाली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला. मात्र हा निर्णय घेऊन बरेच दिवस उलटले, तरी दहावी-बारावीच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, हे विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि २५  टक्के अभ्यासक्रम कमी केल्यामुळे यंदाच्या परीक्षा कशा पद्धतीने होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

बारामतीकरांच्या कोरोना लढाईला सॉफ्टवेअरचे बळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासगटातील सदस्या नेहा पेंढारकर म्हणाल्या,"परीक्षा पद्धती कशी असावी, यासंदर्भात अभ्यास मंडाळातील विषय तज्ञांच्या ऑनलाइन बैठका सध्या सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अभ्यासक्रमातील काही भाग स्वयं अध्ययनासाठी देण्यात आला आहे. तर काही पाठ हे वगळले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार कमी केलेला अभ्यास विचारात घेऊन बोर्डाच्या परीक्षेची यंदा पद्धती कशी असेल, किंवा असावी यासंदर्भात आराखडा बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय अधिकृतरित्या राज्य शिक्षण मंडळामार्फत जाहीर केला जाईल."

"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला असला, तरी तो सरसकट कमी केलेला नाही. अभ्यासक्रमातील काही भाग क्लासरूम टीचिंगमधून वगळला असून तो विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी दिला आहे. यंदा मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात अभ्यास गटाने सूचविलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन निर्णय घेण्यात येईल."
- डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Video : 'दार उघड उद्धवा, दार उघड', भर पावसात भाजपने घातला गोंधळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10th,12th syllabus has been reduced but what will be the examination system of the board