esakal | डिंभे भरेल इतका धरणातून विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Dimbhedharan

आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यासह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा तालुक्‍याला वरदान ठरणारे डिंभे धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे बळिराजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. धरण क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे जास्तीचे सव्वाअकरा टीएमसी पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला आहे. जवळपास पूर्ण धरण भरेल इतका पाण्याचा विसर्ग अवघ्या 20 दिवसांत करण्यात आला आहे.

डिंभे भरेल इतका धरणातून विसर्ग

sakal_logo
By
नवनाथ भेके

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यासह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा तालुक्‍याला वरदान ठरणारे डिंभे धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे बळिराजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. धरण क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे जास्तीचे सव्वाअकरा टीएमसी पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला आहे. जवळपास पूर्ण धरण भरेल इतका पाण्याचा विसर्ग अवघ्या 20 दिवसांत करण्यात आला आहे.

जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना डिंभे धरण काही भरेना. त्यामुळे बळिराजामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. पावसाला जोर नसल्याने धरण दररोज अर्धा ते एक टक्‍क्‍याने भरत होते. त्यावेळी साधारण 27 जुलै रोजी डिंभे धरण 46 टक्के भरले होते. त्यानंतर धरण क्षेत्रात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या आठ दिवसांत धरण 50 टक्के भरून टक्केवारी 96 टक्‍क्‍यांवर गेल्याने घोडनदी उजवा व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. त्यावेळी घोडनदीला पूर आला होता.

डिंभे धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे घोड नदीपात्रात पाण्याच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. त्यामुळे घोड नदीपात्रात 20 दिवसांत तब्बल 10.44 टीएमसी, डावा व उजवा कालव्यात पाऊण टीएमसी असा एकूण सव्वाअकरा टीएमसी पाणी डिंभे धरणातून सोडण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ शिरूर तालुक्‍यातील घोड धरणाला झाला आहे. हे धरण 100 टक्के भरले आहे. धरणातील पाण्याचे पूजन कुकडीचे कार्यकारी अभियंता एस. जे. माने यांनी सपत्निक केले आहे. सध्या डिंभे धरणातून घोडनदीतील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर उजव्या कालव्यात 150 व डाव्या कालव्यात 400 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत सल्याची माहिती डिंभे धरण विभागाचे तानाजी चिखले यांनी दिली.

loading image
go to top