पुण्यात 11 वर्षांच्या मुलाचा पतंग उडविताना टाकीत पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

वडगाव बुद्रुक येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीवर जाऊन अथर्व बापू गोरे (वय 11) राहणार तुकाई नगर, हा 10 वाजता त्याच्या मोठा भाऊ संतोष बापू गोरे सोबत पतंग उडविण्यासाठी गेला होता.

पुणे : पतंग उडविताना एका 11 वर्षीय मुलाचा वडगाव बुद्रुक जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकही नसल्याने मुलांची गर्दी होत असते, त्यातूनच ही घटना घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वडगाव बुद्रुक येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीवर जाऊन अथर्व बापू गोरे (वय 11) राहणार तुकाई नगर, हा 10 वाजता त्याच्या मोठा भाऊ संतोष बापू गोरे सोबत पतंग उडविण्यासाठी गेला होता. पतंग उडवताना पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने अथर्व याचा पाय घसरून टाकीत पडून मृत्यू झाला असल्याचे सिंहगड रोड पोलिसांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. शव विच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आला आहे. महापालिकेच्या या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी एकही सुरक्षारक्षक नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 year old boy dies drown in tank at Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: