Pune News : अतिरिक्त जमिनीचा घेतला लाभ; जिल्ह्यात तब्बल ११९ धरणग्रस्तांचा समावेश
Pune Land Probe : पुणे जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या धरण प्रकल्पग्रस्तांपैकी ११९ लाभार्थ्यांना दुबार लाभ किंवा जादा जमीन मिळाल्याचे उघड झाले आहे. सर्वाधिक प्रकरणे पवना धरण क्षेत्रातील आहेत.
पुणे : जिल्ह्यात ११९ धरणग्रस्त लाभार्थ्यांनी दुबार लाभ किंवा निर्धारित लाभापेक्षा अतिरिक्त जमिनीचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पवना धरणातील २२ प्रकल्पग्रस्तांचा समावेश आहे.