
Sassoon Hospital
Sakal
पुणे : तातडीच्या खर्चासाठी असलेला ‘पब्लिक लेजर अकाउंट’ निधी हा ससूनमध्ये ११ कोटी ९९ लाख रुपयांचा असून, तो रुग्णालयाच्या तातडीच्या कामांसाठी वापरण्यात येतो. हे खाते प्रामुख्याने रुग्णालयातील लेखा विभाग किंवा मुख्य लेखाधिकारी सरकारच्या नियम व लेखा पद्धतीनुसार चालवतात. त्याचा वापर थेट गरीब रुग्णांसाठी करता येत नसून त्याचा खर्च करण्यासाठी वेगळे निकष असल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिली.