
पुणे : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील अंतिम फेरी मंगळवार (ता. २६) ते शनिवारदरम्यान (ता. ३०) होणार आहे. आतापर्यंत प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ही अंतिम फेरी असेल. या अंतिम विशेष फेरीअंतर्गत ‘अलॉटमेंट’ शुक्रवारी (ता. २९) जाहीर होईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.