
पुणे : इयत्ता अकरावीच्या तिसऱ्या नियमित फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम बुधवारपर्यंत (ता. २३) देता येणार आहे. या फेरीची निवड यादी शनिवारी (ता. २६) जाहीर होणार आहे.