
पुणे : राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) पहिल्याच दिवशी तब्बल पाच हजार ४९७ विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे.