
पुणे : संपूर्ण राज्यातील तब्बल नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा ‘पेपर’ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाला अवघड गेला आहे. अकरावीच्या प्रवेशाची पहिल्या नियमित फेरीची निवड यादी, महाविद्यालयांचा कट-ऑफ गुरुवारी जाहीर होणार होता, परंतु संपूर्ण राज्यात अकरावीच्या ऑनलाइनद्वारे प्रवेशाचा हा ‘भार’ डोईजड झाल्याने शिक्षण विभाग प्रवेशाच्या पहिल्याच परीक्षेत ‘नापास’ झाला आहे.