PMC Budget 2021-22 : सीओईपीच्या विद्यार्थ्यांसाठी पादचारी पूल; अंदाजपत्रकात १२ कोटीची तरतूद

12 crore provision in the PMC Budget 2021-22 for Pedestrian bridge for COEP students
12 crore provision in the PMC Budget 2021-22 for Pedestrian bridge for COEP students

पुणे  ः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) वसतिगृहाच्या परिसरात प्रचंड वाहतूक वाढल्याने तेथे पादचारी पूल करावा, अशी मागणी विद्यार्थी गेले काही वर्ष करत होते. अखेर त्या पुलासह महाविद्यालयाच्या परिसरात उड्डाणपूल अंतर्गत बांधकाम व आवाज कमी करण्यासाठी ध्वनीरोधक बसविले जाणार आहेत. यासाठी पुणे महापालिकेने अंदाजपत्रकात १२ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने सीओईपी महाविद्यालयाच्या चौकात दुहेरी उड्डाणपूल बांधला. त्यामध्ये सीओईपीची जागा गेली आहे. संचेती रुग्णालयाच्या समोर ग्रेडसेपरेटर बांधला आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुसाट झाली आहे. जंगली महाराज रस्त्यावर एका बाजूला सीओईपीचे वसतिगृह तर दुसऱ्या बाजूला मैदान आहे. विद्यार्थ्यांना हा रस्ता ओलांडणे खूप धोकादायक झालेला आहे. त्यामुळे गेल्या तीन चार वर्षांपासून महापालिकेने पादचारी पूल बांधावा, अशी मागणी केली जात होती. त्यासाठी महापालिका आणि सीओईपी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यामध्ये नेमकी कोणती कामे केली जावीत, हे ठरविण्यात आले आहे.

PMC Budget 2021-22 : पुणे महापालिका बजेट ठळक मुद्दे काय आहेत वाचा

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात या कराराला अनुसरून उड्डाणपूल अंतर्गत काम केले जाणार आहे. उड्डाणपुलामुळे महाविद्यालयाच्या परिसरात गोंगाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्याचा परिणाम शैक्षणिक वातावरणावर होत आहे. त्यामुळे सीओईपीमध्ये ध्वनीरोधक बसविले जातील. त्याचप्रमाणे जिना करणे आदी कामांसाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सीओईपीचे संचालक डॉ. भारतकुमार अहुजा म्हणाले, ‘‘जंगली महाराज रस्त्यावर वाहने भरधाव जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पादचारी पूल उभारणे व इतर कामे करणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेने अंदाजपत्रकात तरतूद केली, याचे स्वागत आहे. लवकर काम पूर्ण करावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com