
सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त पुणे विद्यापीठात 12 फुटी पुतळ्याचे होणार अनावरण
पुणे (कात्रज) : पुणे विद्यापीठात महात्मा फुले यांचे स्मारक आहे. मात्र, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती स्मारक नाही. ते व्हावे अशी मागणी होत होती. त्यास विद्यापीठ कुलगुरू व प्रमुख अधिकारी मान्यता व सर्व परवानग्या घेऊन ३ जानेवारीला सावित्रीफुले यांच्या जयंतीनिमित्त १२०० किलो ब्राँझ धातूच्या साडे बारा फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा: शेतकऱ्यांची आणखी एक मागणी मान्य, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर येथील परदेशी मूर्तीवाले यांना सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बनविण्याचे काम देण्यात आले होते. भुजबळ व विद्यापीठाच्या प्रमुख अधिकारी यांनी पाहणी करत कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रकाश कदम, प्रा.हरी नरके, विद्यापीठ रजिस्टर प्रफुल पवार, अविनाश चौरे, व्यवस्थापक विभाग कमिटीचे राजेश पांडे, संजय चाकणे, डॉ.सुधाकर जाधवर, प्रतिक कदम आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, 'सावित्रीबाई फुले यांचे संग्रहित जुने फोटो नुसार पूर्णाकृती पुतळा होत आहे. त्याची पाहणी करून काही सूचना केल्या आहेत. तसेच महात्मा फुले वाडा ते सावित्रीबाई फुले स्मारक पर्यंत जाणारा रस्ता, भिडेवाडा आणि विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या स्मरकाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक होणार आहे. यावेळी शिल्पकार संजय परदेशी यांचे भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे मेहनतीने सुंदर कलाकुसर केल्याबद्दल कौतुकही केले.
Web Title: 12 Feet Statue Will Be Unveiled At Pune University On The Occasion Of Savitribais Birthday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..