Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार: एकाच रात्री दोन गोठयांवर बिबट्याचा हल्ला

दोंदे (ता. खेड) येथे बिबट्याने एकाच रात्री दोन गोठयांवर केलेल्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार झाल्या, तर दोन शेळ्या जखमी झाल्या.
leopard Attack
leopard Attacksakal
Updated on: 

कडूस - दोंदे (ता. खेड) येथे बिबट्याने एकाच रात्री दोन गोठयांवर केलेल्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार झाल्या, तर दोन शेळ्या जखमी झाल्या. मंगळवारी (ता.१२) रात्री ही घटना घडली. यात दोन नवउद्योजक शेतकरी तरुणांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

खेड तालुक्याच्या वडगाव-पाटोळे, दोंदे, कडूस परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. परिसरात कुत्री, वासरे व शेळ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु मंगळवारी रात्री बिबट्याने दोंदे परिसरात अक्षरशः हैदोस घातला. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेळ्यांच्या गोठ्यावर हल्ला केला.

पहिला हल्ला कडूस रस्त्याच्या कदमवस्तीतील बंदिस्त शेळीपालन करणारा नवउद्योजक तरुण राहुल शंकर म्हेत्रे यांच्या शेळीपालन गोठ्यावर केला, तर दुसरा हल्ला उढाणेस्थळ येथील गणेश ढमाले यांच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर केला. यात म्हेत्रे यांच्या गोठ्यातील सात बोकड ठार झाले, तर दोन बोकड जखमी झाले व ढमाले यांच्या पाच शेळ्या ठार झाल्या. म्हेत्रे यांचा बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय आहे.

बिबट्याने मध्यरात्री सुमारे सात फूट उंचीच्या भिंतीवरील लोखंडी काटेरी तारेवरून उडी मारून गोठ्यातील बोकडांच्या विभागात प्रवेश केला. म्हेत्रे यांच्या शेळ्यांवरील हल्ल्याचा थरार शेळ्यांच्या गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात बिबट्याचा हल्ला रात्री बारा वाजता झाला. सुमारे पंधरा मिनिटे बिबट्या गोठ्यात होता. या पंधरा मिनिटात बिबट्याने नऊ बोकडांवर हल्ला केला.

यात सात बोकड जागेवरच ठार झाले, तर दोन बोकड जखमी झाले आहेत. मारलेल्या एकाचेही मांस बिबट्याने खाल्ले नाही. हल्ल्याची ही घटना म्हेत्रे यांच्या सकाळी लक्षात आली. बोकडांची मान व पाठीमागील पायांच्या भागावर दात व पंजाने मारलेल्या खोल खुणा होत्या. सध्या म्हेत्रे यांच्या गोठ्यात पन्नास पेक्षा जास्त शेळ्या आहेत. गेल्याच पंधरावड्यात त्यांनी सुमारे पन्नास शेळ्यांची विक्री केली होती.

या शेळ्या गोठ्यात असत्या तर नुकसानीची तीव्रता आणखी वाढली असती. म्हेत्रे यांच्यानंतर बिबट्याने जवळच्या उढाणेस्थळ येथील ढमाले यांच्या घरासमोरील गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला. यात ढमाले यांच्या पाच शेळ्या ठार झाल्या. घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौन्धळ यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली.

वनविभागाचे एम. बी. बढे यांनी दोन्ही ठिकाणच्या मृत शेळ्यांचा पंचनामा केला आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात पाच पेक्षा अधिक बिबटे असल्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahmednagar Leopard Attack 65 Year Old Mother Fights Leopard With Sickle To Save Herself And Her Son
Ambegaon Leopard Attack Farmer Escapes Safely After Leopard Jumps From Sugarcane Field Forest Department Installs Cage
Leopard
Leopard attack kills four sheep, injures 23 in Shirur.
Marathi News Esakal
www.esakal.com