तळ्यात साठणार १२ लाख लिटर पाणी

तळ्यात साठणार १२ लाख लिटर पाणी

फुलवडे, ता. १० : फदालेवाडी-उगलेवाडी (ता. आंबेगाव) येथील घमाचीवाडी येथे तळ्याचे खोलीकरण पूर्ण करण्यात आले. सकाळ रिलीफ फंड, भोसरी येथील न्यूमन अँड इस्सार इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.


खोलीकरणामुळे तळ्याची पाणी साठवण क्षमता १२ लाख ११ हजार ३५५ लिटर इतकी झाली आहे. त्यामुळे ३०० लोकसंख्या असलेल्या घमाच्या वाडीतील कुटुंबांना व जनावरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याची माहिती सरपंच विनोद उगले यांनी दिली.
घमाचीवाडी येथील पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी सकाळ रिलीफ फंडाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ३५ फूट लांबी, ३५ रुंदी असलेल्या तळ्याचे अतिरिक्त १५ फूट खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी सकाळ रिलीफ फंडाचे आभार मानले आहे.

याप्रसंगी तळ्यातील पाण्याचे पूजन तुळसा उगले, हौसा उगले, कमल उगले, स्वाती उगले, संजीवनी उगले, मुक्ता भोते यांनी केले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र उगले, उपसरपंच विलास उगले, गणेश कर्पे, शंकर शिंगाडे, किसन भोजने, प्रदीप उगले, देवराम उगले, शांताराम उगले, ठेकेदार किरण लवंगे आदी उपस्थित होते.

03095

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com