esakal | टेमघर धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा

बोलून बातमी शोधा

Temghar Dam

टेमघर धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट - लवार्डे (ता. मुळशी) येथील टेमघर धरणातील पाणीसाठा केवळ १२ टक्के (०.४५ टीएमसी) शिल्लक राहिला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर गळती थांबविण्यासाठी या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सध्याचा उरलेला साठाही पूर्ण रिकामा केला जाणार असल्याने तो शून्य टक्क्यांवर जाणार आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, टेमघर धरणात सध्या १५.७१ दशलक्षघनमीटर इतका एकूण साठा असून, त्यापैकी १२.७६ दशलक्षघनमीटर इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या धरणातील पाण्याच्या साठ्याची टक्केवारी १२.१५ इतकी आहे. धरणाची गळती थांबविण्यासाठी सलग चार वर्षे सातत्याने ग्राउटिंगचे काम करावे लागले आहे. गळतीमुळे सन २०१४ ते सन २०१८ या कालावधीत या धरणाच्या ग्राउटिंगचे काम करावे लागले. सलग चार वर्षांनतर गेल्यावर्षी सुमारे ९५ टक्के गळती थांबल्यामुळे या धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने साठवायला सुरवात केली. या वर्षी सुमारे ९५ टक्के गळती थांबल्यामुळे या धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने साठवू लागले होते.

धरणाची उर्वरित ५ टक्के गळती थांबण्यासाठी या वर्षीही ग्राउटिंगचे काम हाती घ्यावे लागणार आहे. शासनाने काम करण्यास मान्यता दिल्यानंतर पाणीसाठी कमी करण्याचे नियोजन आहे.

- एच. जी. जाधव, उपअभियंता, टेमघर प्रकल्प उपविभाग क्रमांक २