न्यायालयात जिंकले मात्र 12 वर्षाच्या मुलासमोर हरले

 12 year old boy is not ready to go to his parents Even after the court order
12 year old boy is not ready to go to his parents Even after the court order

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेकांच्या नात्यातील वीण आणखी घट्ट झाली. तर काहींना जवळचे दुरावले. कुटुंब व नातेवारईंकांना विसरलेले या काळात पुन्हा एकत्र आले. कोविड-१९ च्या निमित्ताने आजीसोबतचे नाते अधिक दृढ झाल्याने मुलगा आपल्या आईवडिलांकडे जाण्यास तयार नसल्याचा प्रसंग पुढे आला आहे. विशेष म्हणजे मुलाचा ताबा आईवडिलांकडे द्यावा, असा निर्णय या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिला आहे.

आर्इ आजारी असल्याने १२ वर्षीय आयुष (नाव बदललेले) त्याच्या आजीकडे (आर्इची आर्इ) नाशिकला राहायला गेला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने तो तिकडेच रमला. आर्इचा उपचार पूर्ण झाल्यानंतर वडील त्याला घेऊन जाण्यासाठी आले. मात्र त्याने त्यांच्याबरोबर जाण्यास स्पष्ट नकार दिला. या काळात त्याचा शाळा सुरू झाली होती. तीही त्याने आजीकडेच थांबून आनलार्इन पद्धतीने सुरू केली. मुलगा आपल्याकडे येण्यास व त्याचा ताबा देण्यास आजी तयार नसल्याने शेवटी आईवडील बाल न्यायालयात गेले. मुलाचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी अर्ज केला. मात्र आईवडील मुलाला त्रास देतात. त्याचा व्यवस्थित सांभाळ करीत नाहीत, असे आजीने तेथे शाबीत केले. त्यामुळे आयुषचा ताबा त्याचा आजीकडेच राहू द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला.

या आदेशाचा विरोधात मुलाचे आईवडील जिल्हा बाल न्यायालयात गेले. त्या न्यायालयात असे दावे चालविण्याचा अधिकार नसल्याने आईवडिलांनी अॅड. सूचित मुंदडा आणि अॅड. राजेश मोरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील केले. आयुषचा ताबा त्वरित आईवडिलांना द्यावा. आजीने प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी दोन ते पाच यावेळेत आयुषला भेटावे, असा आदेश त्यात उच्च न्यायालयाने दिला आहे. आयुषचे आईवडील पुण्यातच असतात. वडील एका आयटी कंपनीत कामाला आहेत तर आई गृहिणी आहे.

गजा मारणे मिरवणूक प्रकरण : गुंड समर्थकांचं फोन रेकॉर्ड पोलिस तपासणार

मला आजीकडेच थांबायचे आहे 
निकालाच्या आदेशासाठी आजी, आयुष आणि त्याचा आईवडिलांना उच्च न्यायालयाने न्यायालयात बोलावले होते. त्यावेळी आयुषने मला आईवडिलांकडे जायचे नाही. आजीबरोबरच थांबायचे आहे, असे न्यायालयास सांगितले. त्यामुळे पोलिसही त्याच्यापुढे हतबल झाले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करायची असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com