esakal | गजा मारणे मिरवणूक प्रकरण : गुंड समर्थकांचं फोन रेकॉर्ड पोलिस तपासणार
sakal

बोलून बातमी शोधा

IPS_Krishna_Prakash

गजानन मारणे याची १५ फेब्रुवारीला तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्याच्या टोळीने शेकडो गाड्यांच्या ताफ्यात तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढली.

गजा मारणे मिरवणूक प्रकरण : गुंड समर्थकांचं फोन रेकॉर्ड पोलिस तपासणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या मिरवणुकीत सामील असलेल्या त्याच्या इतरही समर्थकांवर कारवाई करण्यासाठी तळोजा कारागृह ते पुणे या मार्गावर ऍक्टिव्ह असलेल्या फोनचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्या आधारावर त्यावेळेत तेथून गेलेल्या वाहनांतील व्यक्तींची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. 

बारामतीत हनीट्रॅप! बडतर्फ पोलिसांसह सातारच्या चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात​

गजानन मारणे याची १५ फेब्रुवारीला तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्याच्या टोळीने शेकडो गाड्यांच्या ताफ्यात तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढली. पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी मारणेसह त्याच्या साथीदारांनी दहशतीचे वातावरण निर्माण करून फुडमॉलवर पाण्याच्या बाटल्या आणि वडापाव घेतले. याप्रकरणी शिरगाव आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात शिरगाव पोलिसांनी अद्यापपर्यंत १४ वाहने जप्त केली असून ३६ जणांना अटक केली आहे. यासह इतर आरोपींचाही शोध घेतला जाणार आहे.

अखेर ठरलं! पुणे विद्यापीठाची परीक्षा ११ एप्रिलपासून; नवे वेळापत्रक लवकर जाहीर होणार​

यासाठी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणे याच्या फोनवर आलेले फोन तसेच त्यावेळेत तळोजा कारागृह ते पुणे या मार्गावर अॅक्टिव्ह असलेल्या फोनचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीचे काम सुरू आहे. या आधारावर मारणेच्या मिरवणुकीत सामील असलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच मारणे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top