स्कूल बसच्या चाकाखाली सापडून बारा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Bus

स्कूलची बस वळण घेत असताना मागच्या चाकाखाली आल्याने बारा वर्षीय विद्यार्थ्याचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

स्कूल बसच्या चाकाखाली सापडून बारा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

धायरी - दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात वडगाव खुर्द येथील मनपाच्या राजयोग सोसायटीतील मुरलीधर लायगुडे रुग्णालयासमोर ब्लॉसम पब्लिक स्कूलची बस वळण घेत असताना मागच्या चाकाखाली आल्याने बारा वर्षीय अर्णव अमोल निकम (राहणार -राजयोग सोसायटी वडगाव खुर्द) याचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातामुळे बस मधील शाळकरी मुले भयभीत झाली होती. मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नुकत्याच शाळा सुरू झाल्या असल्यामुळे ब्लॉसम पब्लिक स्कुल बस विद्यार्थीना सोडण्यासाठी राजयोग सोसायटी जवळील पीएमपीएलच्या बस थांब्याजवळ आली असता ,बस थांब्यावर  अर्णव आणि इतर विद्यार्थी उतरल्यावर स्कुल बस वळत असताना  चालकाचे लक्ष नसल्याने काही काळण्याच्या आगोदरच बसचे मागील चाक अर्णवच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन,बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर (वय-४९, राहणार धनकवडी) याला ताब्यात घेउन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याला जवळील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच अर्णवला डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यानंतर शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास सिंहगड रोड सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहे. वाहनातून उतरताना व चढत असताना आणि रस्त्यावर मुलांनी काळजी घ्यावीअसे अव्हान पोलीसांनी केले.

Web Title: 12 Year Old Student Died Spot School Bus Accident Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top