
हडपसर : पालखी सोहळ्यातील आध्यात्मिक सुखाच्या अनुभूतीसाठी अनेक जण विविध प्रकारे योगदान देत असतात. वारकऱ्यांचे श्रम कमी करणे आणि त्यांच्या थकलेल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड येथील योग विद्याधाम संस्थेच्या वतीने दरवर्षी केला जात आहे. या संस्थेने यावर्षी अशा सेवाकार्याची तपपूर्ती केली आहे.