पुणे जिल्ह्यात १२३७ नवे कोरोना रुग्ण; दिवसात ३१३७ कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ५२८ जण आहेत. दरम्यान, आज दिवसभरात ३ हजार १३७ कोरोनामुक्त झाले आहेत. आज ८ हजार ४८८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

पुणे - पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १ हजार २३७  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ५२८ जण आहेत. दरम्यान, आज दिवसभरात ३ हजार १३७ कोरोनामुक्त झाले आहेत. आज ८ हजार ४८८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये २८९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २९२, नगरपालिका क्षेत्रात ९५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३३ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख १० हजार ४३० झाली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ७८ हजार १०४ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आज अखेरपर्यंत एकूण ७ हजार २९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील  ३१९ जण आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1237 new corona patients in Pune district