esakal | पुणे जिल्ह्यात दिवसातील नवे रुग्ण १३ हजारांच्या घरात
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

पुणे जिल्ह्यात दिवसातील नवे रुग्ण १३ हजारांच्या घरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांनी शनिवारी (ता. १७) सात लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे सहा लाख रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. वर्षभरात अन्य ११ हजार ३१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज पहिल्यांदाच १२ हजार ८३६ इतके उच्चांकी नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील सहा हजार सहा जण आहेत. आज शंभर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील ५४ मृत्यू आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी किमान शंभर किंवा त्याहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक ४७ हजार २७६ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज ११ हजार ७२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार ६०९ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ७५६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ४४६, नगरपालिका हद्दीतील ७७७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १३५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

हेही वाचा: प्रवाशांनो, पुणे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नका

आजच्या एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २ हजार ९८२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ८८९, नगरपालिका हद्दीतील ७७० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १८९ रुग्ण आहेत.आज पिंपरी चिंचवडमध्ये ३२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन मृत्यू झाले आहेत. नगरपालिका हद्दीत आज एकही मृत्यू झाला नाही.

सद्यःस्थितीत २५ हजार ६४२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच ७४ हजार ८०२ गृहविलगीकरणात आहेत. रुग्णालयांतील रुग्णांमध्ये पुणे शहरातील ९ हजार १७३ जण आहेत.