पुणे : सावधान, 133 गावांनो,आपण पिताय दूषित पाणी

133 villages in Pune district are victims of polluted water
133 villages in Pune district are victims of polluted water

पुणे : जिल्ह्यातील 133 गावे दूषित पाणी पीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाणी तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या गावांनी सावध होण्याचे आणि पाणी शुद्ध करून पिण्याचे आवाहनही जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. शिवाय या गावांमधील पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याचा आदेशही संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आला आहे.

सद्यःस्थितीत अशुद्ध पाणी पीत असलेली तालुकानिहाय गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. आंबेगाव - आहुपे, आसाणे, अवसरी खुर्द, भावडी, गिरवली, काळेवाडी-दरेकरवाडी, खडकवाडी, लांडेवाडी, लोणी, नारोडी, निघुटवाडी, निरगुडसर, पारगाव (शिंगवे), पेठ, पिंपळगाव तर्फे घोडा, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, शिंदोली, टाव्हरेवाडी.

बारामती - चौधरवाडी, गडदरवाडी, जळगाव सुपे, करंजेपूल, खंडोबाचीवाडी, कोऱ्हाळे खुर्द, मगरवाडी, निंबूत, पवईमाळ, सांगवी. भोर - नसरापूर, रांजे, वेळू. दौंड - खडकी. हवेली - भिवरी, देहू, डोणजे, मनेरवाडी, न्हावी-सांडस, निरगुडी, पिंपरी सांडस, शेवाळेवाडी, सिरसवाडी, थेऊर, वडगाव शिंदे, वरदडे, वाडेबोल्हाई. इंदापूर - अकोले, भिगवण,बोरी, कळंब, काटी, काझड, नीरनिमगाव, पडस्थल, सराफवाडी, तावशी, वरकुटे बुद्रूक, वरकुटे खुर्द. जुन्नर - आगर, अंबोली, आपटाळे, भिवडे खुर्द, देवळे, धामणखेल, डिंगोरे, डुंबरवाडी, काले, निमगावसावा, निमगिरे, पिंपळगाव जोगा, सुलतानपूर, उंब्रज नं. 2, वडगाव सहानी, वडगाव आनंद.

खेड - अनावळे, आसखेड खुर्द, औदर, डेहणे, गोळेगाव, गोणवडी, होलेवाडी, कडधे, कन्हेरसर, काळूस, कोरेगाव बुद्रूक, मरकळ, मोरोशी, नायफड, नाणेकरवाडी, निमगाव, पाईट, पिंपरी बुद्रूक, राक्षेवाडी, रासे, साबुर्डी, सोळू, तळवाडे, तिफणवाडी, वडगाव घेनंद, वाडा, वाशेरे.

मुळशी - अकोले, आंदेसे, भरे, भुकूम, काशिंग, लवळे, मुगावडे, मुळशी खुर्द, शेंदाणी, सूस, वळणे. शिरूर - नागरगाव, सादलगांव, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, निर्वी, पिंपळसुटी, निमगाव म्हाळुंगी, चिंचणी, इनामगाव, आंधळगाव, कोळगाव डोळस. वेल्हे - अंत्रोली, भालवडी, भट्टी वागधरा, धानेप, घिसर, हरपूड, जाधववाडी, केळद, कोळंबी, निवी गेव्हंडे आणि शेणवड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com