esakal | पुणे ‘झेडपी’च्या १३३४ शाळा ऑफलाइन शिक्षणास तयार
sakal

बोलून बातमी शोधा

School

पुणे ‘झेडपी’च्या १३३४ शाळा ऑफलाइन शिक्षणास तयार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ग्रामीण भागात (Rural Area) कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Infection) कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या (ZP) १ हजार ३३४ शाळा (School) सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शाळांच्या शालेय व्यवस्थापन समित्यांनी नियमित शाळा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे किमान दीड वर्षाच्या खंडानंतर या शाळा सुरू होणार आहेत. (1334 Schools of Pune ZP Ready for Offline Education)

राज्य सरकारने इयत्ता आठवी तेे बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील माध्यमिक शाळा नियमितपणे सुरू होणार आहेत. पण प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत सरकारने अद्याप आदेश दिला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ऑनलाइन सुरू राहणार की, त्या पुन्हा नियमितपणे सुरू होणार, याबाबत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शालेय व्यवस्थापन समित्यांना अधिकार दिले आहेत.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्याही पुढे जग आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा''

हे अधिकार देण्यापूर्वी किती गावे, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समित्या गावांतील प्राथमिक शाळा नियमितपणे सुरू करण्यास तयार आहेत, याचे सर्वेक्षण नुकतेच केले. यात १ हजार ३३४ शालेय व्यवस्थापन समित्या आणि ४ हजार २८० शिक्षकांनी नियमित शाळा भरविण्यास सहमती दर्शविली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात

  • ३६४८ - जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा

  • ११,०९१ - प्राथमिक शिक्षकांची संख्या

  • ३,६४८ - शालेय व्यवस्थापन समित्या

  • १,३३४ - शाळा सुरू करण्यासाठी तयार असलेल्या समित्या

loading image