भीमा सहकारी साखर कारखान्याकडे १३५ कोटींची थकबाकी

Bhima-Sugar
Bhima-Sugar

पुणे - दौंड तालुक्‍यातील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे १३५ कोटींचे कर्ज थकले आहे.. दरम्यान, या वसुलीसाठी बॅंकेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

थकबाकीमुळे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण वाढल्याने बॅंकेचे आर्थिक नुकसान होत आहे; परंतु बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत नसल्याचे बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सहकारी साखर कारखान्यांना जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्जाचा पुरवठा केला जातो. जिल्हा बॅंक ही संबंधित कारखान्याकडील उत्पादित साखरेच्या तारणावर उचल रूपाने बॅंक कर्ज देते. त्यामुळे कारखान्यांकडे कर्जाची फारशी थकबाकी शिल्लक राहत नाही; परंतु याला भीमा कारखाना अपवाद ठरला आहे. या कारखान्याने वीजनिर्मिती प्रकल्पासाठी मध्यम मुदतीचे कर्ज घेतले आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com