esakal | बारामतीकरांसाठी त्यांनी दिले १४ लाखांचे एक्सरे मशिन
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीकरांसाठी त्यांनी दिले १४ लाखांचे एक्सरे मशिन

कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी पणदरेचे अॅड. केशवराव जगताप यांनी सिद्धेश्वर सहकार संकूलच्या माध्यमातून १४ लाख रुपये किंमतीची मोफत डिजीटल एक्सरे मशीन बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली.

बारामतीकरांसाठी त्यांनी दिले १४ लाखांचे एक्सरे मशिन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माळेगाव : कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी पणदरेचे अॅड. केशवराव जगताप यांनी सिद्धेश्वर सहकार संकूलच्या माध्यमातून १४ लाख रुपये किंमतीची मोफत डिजीटल एक्सरे मशीन बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थात बारामतीमधील शासकिय सिल्व्हर ज्युबली हाॅस्पीटल प्रशासनाने सदरची एक्सरे मशीन आनंदाने स्वीकारली. विशेषतः जगताप यांनी याआगोदरही बारामती तालुक्यात जलसंधारणाच्या कामासह मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सकाळ रिलीफ फंड, शिक्षणासाठी अर्थिक मदत करणे, आरोग्य शिबीरे, व्यायामशाळा, वाचनालय, मंदीर जीर्णोद्धार आदी समाजपोयोगी कार्य़ासाठी अलीकडच्या काळात दोन कोटी पेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याची नोंद आहे.

दरम्यान, बारामती शहर व तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीच्या मदतीने सरकारी आरोग्य यंत्रणा रुग्णांना उपचार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. हे प्रयत्न करत असताना रुग्णांचे निदान व उपचार वेळत होणे क्रमप्राप्त बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये डिजिटल एक्सरे मशीनची कमतरता जानवत होती. अर्थात ही कमतरता सिल्व्हर ज्युबली हाॅस्पीटलचे प्रमुख डाॅ. सदानंद काळे, डाॅ महेश जगताप, डाॅ. निर्मल कुमार वाघमारे, डाॅ. दशरथ चवरे, डाॅ. रणजित मोहिते, डाॅ. अक्षय जरांडे इत्यादींनी पत्राद्वारे केशवराव जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, जगताप यांनीही ८ सप्टेंबर रोजी मिळालेले वरील मागणी पत्र सिद्धेश्वर सहकार संकूलच्या संचालक मंडळासमोर मांडले. सहाजिकच संबंधित संचालक मंडळाने सुमारे १४ लाख रुपये किंमतीची मोफत डिजीटल एक्सरे मशीन बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर केला. हे विशेष होय. बहु कृपावंते माझीं मायबापें..मी माझ्या संकल्पें अंतरलो..संचिताने नाही तुकों दिला वाट..लाविले अदट मजसवे, या उक्तीचा प्रत्यय जगताप यांच्या कार्यातून येतो. 

एक्सरे मशिनचे फायदे- डिजीटल एक्सरे मिशिनचा दर्जा उच्च प्रतीचा असतो, कोवीड विषाणूमुळे फुप्फूसात झालेल्या संसर्गाचे वेळीच निदान होते, कमी वेळेत अधिक रुग्णांना सेवा देणे शक्य होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा