esakal | सुसंस्कृत पुण्यात लाजिरवाणी घटना; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

सुसंस्कृत पुण्यात लाजिरवाणी घटना; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

sakal_logo
By
सुधीर काकडे

पुण्यातील (Pune) १४ वर्षीय मुलीवर ७ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वानवडीमध्ये (Wanwadi) ही घटना घडली असून, पिडीतेची प्रकृती नाजूक असल्याचे समजते आहे. या घटनेतील सातही नराधमांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. दत्तवाडी येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच रिक्षातून अपहरण करून एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वानवडी परिसरात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी (Pune Police) सात आरोपींना अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १४ वर्षाची मुलगी एका ठिकाणी थांबली असताना रिक्षातून आलेल्या आरोपींनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे समजते.

हेही वाचा: कात्रज परिसरात अवैध धंद्यांना पोलिसांकडून अभय

या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांना आता न्यायालयात नेले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

loading image
go to top