बोरीच्या 142 शेतकऱ्यांनी एकरकमी भरले  51 लाखांचे वीजबिल; गावची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

बोरी (ता. इंदापूर) गावात महावितरणचे 1041 कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे  7 कोटी 71 लाखांची थकबाकी आहे. ह्या थकबाकीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या  उपस्थितीत बोरी येथे शेतकरी ग्राहकांचा मेळावा आयोजित केला होता. दोनशेहून अधिक शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. 

बारामती : इंदापूर तालुक्यातील बोरी  गावातील 142  शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या 96 लाख 78 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी एकाच दिवशी 51 लाख रुपयांचे वीजबिल एकरकमी भरुन शासनाने आणलेल्या कृषी धोरणाचे एक प्रकारे स्वागत केले आहे. या १४२ शेतकऱ्यांना  45 लाख  76 हजारांची माफी मिळाली.  महावितरणने  या शेतकऱ्यांचा  सत्कार  केला . बोरी (ता. इंदापूर) गावात महावितरणचे 1041 कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे  7 कोटी 71 लाखांची थकबाकी आहे. ह्या थकबाकीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या  उपस्थितीत बोरी येथे शेतकरी ग्राहकांचा मेळावा आयोजित केला होता. दोनशेहून अधिक शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. 

मुख्य अभियंता पावडे यांनी सर्व शेतकऱ्यांना ‘कृषी धोरण-2020’ ची माहिती दिली. पहिल्या चालू वर्षात सहभाग घेतल्यास दंड, व्याज, निर्लेखित करुन शिल्लक राहणाऱ्या सुधारित थकबाकी पैकी केवळ  50 टक्के रक्कम भरुन उर्वरित रक्कम माफ होणार हे समजताच शेतकऱ्यांनी लगोलग थकबाकी भरण्याची तयारी दाखविली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

यात 142  शेतकऱ्यांनी 51 लाख  रुपये रक्कम भरली . या सर्व शेतकऱ्यांचा महावितरण तर्फे सत्कार करुन अन्य शेतकऱ्यांनीही अशीच थकबाकी भरण्याचे आवाहन पावडे यांनी केले. तर लवकरच बोरीला शंभर टक्के थकबाकीमुक्त करुन गावची वीज यंत्रणा सक्षम करण्याचा संकल्प सरपंच संदीप नेवरे, छत्रपती कारखान्याचे  उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांध्यासह ग्रामस्थांनी केला.

मेळाव्यास महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांची उपस्थिती होती. तर वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ, लासुर्णेचे शाखा अभियंता अजयसिंग यादव यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

फोटो- शेतकरी मेळाव्यात कृषीपंप थकबाकीचा धनादेश देताना शेतकरी        मिलिंद संगई, बारामती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 142 farmers of Bori paid a electricity bill of Rs 51 lakh