सिंहगड घाटात संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी दीड कोटी मंजूर

सिंहगडच्या आठ किलोमीटरच्या घाटात पावसळ्यात दरवर्षी दरड- माती मुरूम पडत असते. यासाठी संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी यंदा दीड कोटी मंजूर झाला आहे.
Sinhgad Ghat
Sinhgad GhatSakal
Summary

सिंहगडच्या आठ किलोमीटरच्या घाटात पावसळ्यात दरवर्षी दरड- माती मुरूम पडत असते. यासाठी संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी यंदा दीड कोटी मंजूर झाला आहे.

खडकवासला - सिंहगडच्या आठ किलोमीटरच्या घाटात पावसळ्यात दरवर्षी दरड- माती मुरूम पडत असते. यासाठी संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी यंदा दीड कोटी मंजूर झाला आहे.

जिल्हा नियोजनच्या माध्यमातून वनविभागाने हा निधी संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. हे काम पावसाळ्यानंतर काम सुरु होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

घाट रस्त्याचे रुंदीकरण १०- १२ वर्षांपूर्वी केले होते. त्यानंतर, दर्दीनपडण्यास सुरवात झाली. माळीण दुर्घटनेपूर्वी म्हणजे सहा दिवस अगोदर २४ जुलै २०१४ रोजी मोठी दरड पडली. त्यानंतर, घाटातील दरडीची पाहणी वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी केली होती. तत्कालीन आमदार गिरीश बापट व आमदार भीमराव तापकीर यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी तज्ञांच्या वतीने तपासणी करण्यात येईल असे सरकारच्या वतीने उत्तर दिले होते.

त्यानंतर आयआयटी पवईचे तज्ज्ञ, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित येऊन पाहणी केली होती. त्यानंतर, घाटात गरजेच्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवून रस्ता सुरक्षित करण्याचा सूचना तज्ज्ञ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला राज्य सरकार व जिल्हा नियोजन मधून निधी मिळत आहे. ३१ जुलै २०१७ रोजी या सुट्टीच्या दिवशी घाटात पर्यटक असताना मोठी दरड पडली होती. वाहने थांबविल्याने दुर्घटना टळली होती.

माती मुरमाची दरडीसाठी जाळी

सिंहगड घाटातील शेवटच्या टप्प्यातील खडक असलेल्या भागात दरड पडत होती. तेथे प्राधान्याने द्रुतगती महामार्गावर संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत त्याप्रमाणेच जाळ्या बसविल्या आहेत. आता गडावर जाण्याचा रस्ता सुरु होतो. त्या भागात मुरूमाड, खडकाळ, माती, खराळ असा डोंगराचा भाग आहे. सलग तीन चार दिवस जोराचा पाउस झाल्यावर पावसाचे पाणी डोंगरात मुरते. त्यावेळी डोंगरातून मुरूम, माती, खराळ हा भाग निसटतो आणि दरड पडते. त्यासाठी संरक्षक जाळ्या बसविल्या जाणार आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com