इथल्या ग्रामस्थांनी दिला दीडशे गरजूंना मदतीचा हात...

विजय मोरे
Thursday, 30 April 2020

गोजुबावी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी बारामती एमआयडीसीतील लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या गरजू कामगारांच्या दीडशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट नुकतेच वाटप केले.

उंडवडी :  गोजुबावी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी बारामती एमआयडीसीतील लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या गरजू कामगारांच्या दीडशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट नुकतेच वाटप केले. त्यामुळे गरजू व हातावर पोट असलेल्या कुटुंबाची उपासमार थांबण्यास मोठी मदत झाली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

विशेष म्हणजे गोजुबावीकराना नुकताच शासनाकडून मोफत प्रतिमाणूस पाच किलो तांदूळ मिळाला होता. यापैकी दोन किलो तांदूळ व लोकवर्गणी प्रत्येक कुटूंबानी सढळ हातानी जमा केली. 

गोजुबावी या गावाला लागून अगदी जवळ बारामतीची एमआयडीसी आहे. त्यामुळे येथे राज्यासह परराज्यातील कामगार कंपनीतील कामाच्या निमित्ताने आपल्या कुटूंबासह वास्तव्यास आहेत. मात्र कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाऊन अचानक वाढल्याने येथील कुटूंबाकडील जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य संपले होते. त्यामुळे त्या कुटूंबावर उपासमार होण्याची वेळ आली होती. ही बाब गोजुबावीकरांच्या लक्षात आली. त्यानुसार गावच्या सरपंच आश्विनी आटोळे यांनी मदतीसाठी पुढाकार घेवून गावातील ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला गावकऱ्यांनीही मोठा उत्सफूर्त प्रतिसाद देत प्रती कुटूंब दोन किलो तांदूळ व किराणा साहित्यासाठी लोकवर्गणी जमा केली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

 किराणा साहित्य व तांदूळाचे स्वतंत्र किट तयार करण्यासाठी येथील वृषाली सांवत यांच्या मदतीने बारामती टेक्सटाईल्स पार्क येथून कापडी पिशव्या आणून त्या ग्रामस्थांच्या मदतीने भरण्यात आल्या. एमआयडीसी व पिंपळी परिसरातील कुटूंबाना बारामती तालुका पोलिस अधिकार्‍यासमवेत व काही स्वतंत्र्यपणे वाटप करण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या उपक्रमात सरपंच आश्विनी आटोळे , ग्रामसेवक सतिश बोरावके, गावकामगार तलाठी मुलाणी, पोलिस पाटील नितीन गटकळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण गावाने स्वइच्छेने 900 किलो तांदुळ जमा केला होता. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच जालिंदर बगाडे, ग्रामपंचायत सदस्य शरद सांवत, रमेश आटोळे वंदना कदम, मनिषा जाधव, मारूती हुंबे, सिंकदर शेख ,नानासाहेब साळवे, याकुब शेख ,गोरख लंबाते, सविता मदने , सचिन भोसले, गोरख सांवत, काळुराम जाधव, विकास रामदास आटोळे, शेखर होळकर आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 Needy Family got Help in Lock Down Period