धक्कादायक ! पुण्यातून चाइल्ड पोर्नोग्राफीचे तब्बल 150 व्हिडिओ अपलोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

  • पहिला गुन्हा दाखल होऊन दोघे गजाआड

पुणे : देशात चाइल्ड पोर्नोग्राफीला बंदी असतानाही पुण्यातून त्याचे 100 ते 150 व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाने याची माहिती पुणे सायबर पोलिसांना दिल्यावर दोन भावांविरोधात पहिला गुन्हा खडक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना अटक देखील झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज करण पुट्टीलाल (वय 24, रा. गुरुवार पेठ) आणि मनोजकुमार झल्लार सरोज (वय 19, रा. रविवार पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सुरवातीला सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो खडक पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीला बंदी आहे. मात्र तरीही अनेक बेवसाईटवर त्याचे व्हिडिओ अपलोड करण्यात येतात. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी देशातून अपलोड करण्यात आलेल्या सुमारे 35 हजार व्हिडीओंची माहिती नुकतीच गुगलने केंद्र सरकारला दिली होती. त्यानुसार केंद्र सरकारने त्या-त्या राज्यातील पोलिस महासंचालक कार्यालयांना ही माहिती पाठवली. पोलिस संचालक कार्यालयाने संबंधित शहरातील पोलिस आयुक्तांकडे ही माहिती दिली.

काश्मीरमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

पोलिस महासंचालक कार्यालयातून पुणे सायबर पोलिसांना पुण्यातून अपलोड झालेल्या 100 ते 150 व्हिडिओंची माहिती दिली आहे. हे व्हिडिओ ज्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन डाउनलोड झाले आहेत. त्याच्याआयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) नंबरवरून मालकाचा शोध घेतला जात आहे.

जगभरात कोरोनाची दहशत, आतापर्यंत एवढ्या जणांचा मृत्यू; तर...

मोबाईलवरून करीत व्हिडिओ अपलोड 
शहरात दाखल झालेल्या पहिल्याच गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या राज पुट्टीलाल याच्या सिमकार्डद्वारे हा प्रकार सुरू होता. त्याने त्याच्या नात्यातील मनोजकुमारला तो अल्पवयीन असताना स्वतःच्या नावाने सिमकार्ड घेऊन दिल्याची माहिती दिली. मनोजकुमारने त्याच्या मोबाईलवरून युट्युबवर चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी अपलोड केला होता. त्यानुसार दोघांना अटक केली. दोघेही मजुरी करतात,
अशी माहिती पोलिसांनी दिली.

फुल विक्रेत्याच्या खात्यात जमा झाले 30 कोटी रुपये; अन्...

व्हिडिओ कोणी तयार केला?
आरोपींनी पोर्नोग्राफीचा व्हिडिओ सोशल मिडियावरून घेत पुन्हा युट्युबवर अपलोड केला आहे की? त्यांनीच तो तयार केला? याचा पोलिस शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 video uploads of child pornography from Pune