esakal | पक्ष कार्यालयात बर्थडे करणे 16 जणांना भोवले
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पक्ष कार्यालयात बर्थडे करणे 16 जणांना भोवले

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरात संचारबंदी आदेशाचा उल्लंघन करीत बर्थ डे साजरा करणाऱ्या १६ युवकांवर दौंड पोलिसांनी कारवाई केली आहे. चौकातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संपर्क कार्यालयात हा बर्थ डे साजरा केला जात होता.

हेही वाचा: जुन्नर : ट्रॅक्टर अपघातात वडील-मुलाचा दुर्दैवी मृत्यू

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. शहराच्या हुतात्मा चौकात असलेल्या रिपाईं (आठवले गट) संपर्क कार्यालयात १६ एप्रिल रोजी रात्री सुशांत नावाच्या तरूणाचा बर्थ डे साजरा केला जात होता. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना गर्दी करून भरचौकात कार्यालयाचे दार बंद करून बर्थ डे केला जात होता. गस्तीवरील पोलिसांनी कार्यालयाच्या आतून येणारा आवाज आणि हुल्लडबाजी ऐकल्यानंतर हा प्रकार उघड झाला. परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक मयूर भूजबळ यांनी स्वतः पोलिस पथकासह तेथे जाऊन कारवाई करीत तरूणांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले

बर्थ डे साजरा करणारे तेजस विजय कांबळे (वय १९), रॉबीन सुनिल आठवले ( २१), गौरव सुनिल भंडारे (१९ ), अक्षय भिमराव शिंदे (१९), ऋषिकेश बलभिम लिंबोळे (१९), गणेश कालिदास फासगे (१९), आर्यन मायकल सांगळे (२०), सुशांत राजू कांबळे (२१), मंदार प्रकाश पवार (१९), ललित संजय वाघमारे (१९), अजय प्रकाश सलगर (२२, सर्व रा. शालीमार चौक, दौंड), अभिषेक आनंद जाधव (२१, रा. संभाजीनगर, दौंड), ब्रायन जॅान फिलीप (२१, रा. जनता कॅालनी), शाहरूख युसूफ शेख (२५, रा. गवळीवाडा, दत्त मंदिराजवळ), विशाल प्रकाश काटकर (२५, रा. पाटील चौक ) व शाबील अल्ताफ पठाण (वय २१, रा. लिंगाळी, ता. दौंड) यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८ (संचारबंदी आदेशाची अवज्ञा करणे) व कलम २६९ ( संसर्गजन्य रोग पसरवण्याचा संभव असलेली कृती करणे )अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बर्थ डे मध्ये पाच अल्पवयीन मुले देखील सहभागी झाली होती. दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार या प्रकरणी फिर्यादी झाले असून फौजदार सुशील लोंढे पुढील तपास करीत आहेत.