

Land Dispute Turns Violent in Haveli: Crops Damaged, 16 Including Ex-Sarpanch Booked
esakal
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कवडीगाव येथे सुरू असलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असतानाही १० ते १२ जणांना सोबत घेऊन शेतात जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला, महिलांना धक्काबुक्की करण्यात आली, पिकांची नासधूस करून शेतात डेमो हाऊस उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यांवरुन कदमवाकस्तीच्या माजी सरपंचांसह १६ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.