बाप रे, त्या दोघींनी घातला १६ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

माले (ता. मुळशी) येथे सियाराम महा महिला बचत गटातील अध्यक्ष आणि सचिवांनी ४६ महिलांची १६ लाख ५६ हजार रूपयांची फसवणूक केल्‍याबददल पौड पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. 

माले : माले (ता. मुळशी) येथे सियाराम महा महिला बचत गटातील अध्यक्ष आणि सचिवांनी ४६ महिलांची १६ लाख ५६ हजार रूपयांची फसवणूक केल्‍याबददल पौड पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सविता भोलेनाथ घाग आणि स्वाती शिवाजी कदम दोघीही रा. माले, ता. मुळशी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना चंद्रकांत शेंडे, वय-३३  रा. माले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की २५ जानेवारी २०१७ रोजी सविता घाग व स्वाती कदम यांनी परिसरातील ४६ महिलांना गोळा करून बचत गट सुरू केला. या बचत गटात घाग अध्यक्षा तर कदम सचिव म्हणून कामकाज पाहायच्या. बचत गटातील सर्व महिला या दोघीकडे दरमहा एक हजार रूपये जमा करीत. या महिलांनी घाग व कदम यांना बँकेत खाते उघडायला वारंवार सांगितले. परंतु आज-उद्या उघडू असे सांगत त्या दोघींही खाते उघडण्यास टाळाटाळ करीत होत्या. घाग यांचेच स्वतःचे तीन नंबर बचत गटात होते.

अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठांची मनमानी थांबवा; उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश

या दोघींनी गेल्या तीन वर्षात सर्व महिलांची १६ लाख ५० हजारांची फसवणूक केली. बचत गटातील महिला दोघींकडे वारंवार जमा केलेल्या आपल्‍या पैशांची मागणी करीत होत्या. परंतू घाग आणि कदम उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने महिलांनी आपली कैफियत पौड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यापुढे मांडली.

त्यावेळी धुमाळ यांनी संबंधित बीट हवालदार यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतू गुन्‍हा दाखल झाला नव्‍हता, महिलांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली जात, लाँकडाऊन काळात या सर्व महिलांना पौड पोलिस स्टेशनला बोलावून दिवसभर बसवून संध्‍याकाळी परत घरी जायला लावले.

पुण्याच्या या दोन प्राध्यापकांचा विश्‍वेश्‍वरय्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरव 

अखेर मंगळवारी (ता.१५) या महिला पुन्‍हा दिवसभर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्‍या. त्यानंतर पोलिसांनी घाग आणि कदम या दोघींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहेत.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 lakh fraud on self-help group women in Male

Tags
टॉपिकस
Topic Tags: