अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठांची मनमानी थांबवा; उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश

ब्रिजमोहन पाटील
Thursday, 17 September 2020

अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठे स्वायत्ततेचा फायदा घेत मनमानी करत आहेत. विद्यार्थ्यांवर याचा प्रतिकूल परिणाम होत असून, मनोबल खच्चीकरण होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षांचे सुसूत्रीकरण करावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले आहेत.

पुणे - अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठे स्वायत्ततेचा फायदा घेत मनमानी करत आहेत. विद्यार्थ्यांवर याचा प्रतिकूल परिणाम होत असून, मनोबल खच्चीकरण होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षांचे सुसूत्रीकरण करावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील विद्यापीठे अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन -एमसीक्‍यू) घेणार आहेत. विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने दीर्घोत्तरी व वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याची सवय आहे. एमसीक्‍यू परीक्षेत विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्‍यता आहेच, शिवाय ऑनलाइन नंतर ऑफलाइन परीक्षा होणार असल्याने ऑनलाइन परीक्षेत कोणते प्रश्न विचारले गेले आहेत हे आधीच कळणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा देताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर पुनर्विचार व्हावा अशी सूचन गोऱ्हे यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १६) दिवसभरात कोरोना रुग्णांची काय आहे आकडेवारी पहा सविस्तर

राज्यातील विद्यापीठे स्वायत्ततेच्या आधारे कोणताही संवाद, विचारविनिमय न करता विविध घोषणा व परीक्षेचे निर्णय घेत आहेत. त्यात सुसूत्रीकरण करणे गरजेचे आहे, त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर विचार करुण आराखडे देण्यास सर्व विद्यापीठांना सूचना द्यावी. विद्यापीठांच्या अशा मनमानीमुळे विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होत मनोबल खच्चीकरण होत आहे. त्यामुळे परीक्षांचे सुसूत्रीकरण आपल्या विभागाने करावे असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सावंत यांना दिले आहेत.

पुणे झेडपी कोरोना रुग्णांत राज्यात 'अव्वल'

लोकप्रतिनिधींना विचारात घ्या
राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये होत असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना सहभागी करून घेतले जाते नाही, त्यामुळे कुलगुरूंनी लोकप्रतिनिधींनाही विचारात घ्यावे, असेही गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop arbitrariness of universities in final year exam planning dr neelam gorhe