
मंचर - श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी देवढाबा (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथून आलेल्या भाविकांच्या पिकअप गाडीचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात १७ भाविक जखमी आहेत. बुधवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावर पोखरी (ता. आंबेगाव) गावाजवळ अपघात झाला. जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.