esakal | पुणे विभागात आतापर्यंत १७ लाख कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona medical team.jpg

पुणे विभागात आतापर्यंत १७ लाख कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विभागातील १७ लाख २८ हजार ६६२ नागरिकांनी आतापर्यंत कोरोनावर विजय मिळवला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक १० लाख ४५ हजार ९०५ नागरिक हे पुणे जिल्ह्यातील आहेत. मागील सव्वा वर्षातील ही स्थिती आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात ही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे.

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून आजपर्यंत पुणे जिल्ह्यात १० लाख ७४ हजार ७६७ जण कोरोनाबाधित झाले आहेत. विभागातील बाधितांची संख्या ही १८ लाख ९ हजार ९९० इतकी आहे.

हेही वाचा: गोळीबाराचा बदला घेण्यासाठी खूनाची सुपारी; माजी नगरसेवकास अटक

दरम्यान, विभागातील ३७ हजार ३६९ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक १८ हजार ९२ मृत्यू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ हजार २६४, सातारा जिल्ह्यातील ५ हजार ८८, सोलापूर जिल्ह्यातील ४ हजार ४९२ आणि सांगली जिल्ह्यातील ४ हजार ४३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

सद्यःस्थितीत पुणे विभागात एकूण ४३ हजार ९५९ सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. विभागात सर्वाधिक १३ हजार १७९ सक्रिय रुग्ण हे कोल्हापूर जिल्ह्यात तर, सर्वात कमी ३ हजार २५४ रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आहेत. सांगली जिल्ह्यात १० हजार ३२८, पुणे जिल्ह्यात ९ हजार ३३९ आणि सातारा जिल्ह्यात ७ हजार ८५९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

हेही वाचा: लोणावळा धरणाची पातळी वाढली; इंद्रायणी काठच्या गावांना अलर्ट

जिल्हानिहाय कोरोनामुक्त

- पुणे --- १० लाख ४५ हजार ९०५

- सातारा --- १ लाख ९६ हजार ९४५

- सोलापूर --- १ लाख ६३ हजार ७३१

- सांगली --- १ लाख ५१ हजार ६०२

- कोल्हापूर --- १ लाख ७० हजार ४७९

loading image